प्रास्ताविक...

महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक व प्रशासकीय सोयीसाठी राज्यस्तरावर शिक्षण संचालनालयाची व विभागीय स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची निर्मिती केलेली आहे. शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख हे शिक्षण संचालक असून राज्यामध्ये 8 विभागीय शिक्षण उपसंचालक आहेत. त्यात कोल्हापूर विभागीय उपसंचालक यांचे कार्यालय सोमवार पेठ, हत्तीमहल, गंजी गल्ली, कोल्हापूर या ठिकाणी असून या विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे येतात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालये व प्रौढ शिक्षण स्तरावरील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींसदर्भात विभागीय प्रमुख म्हणून विभागीय उपसंचालक हे काम पाहतात. विभागीय कार्यालय, दुय्यम कार्यालये तसेच शिक्षणसंस्था यांच्यात माहितीचे आदानप्रदान सुलभ व वेगवान व्हावे तसेच, कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक धोरणास अनुसरून या वेबसाईटची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मनुष्यबळ, वेळ, इंधन व पैसा यांची मोठ्या प्रमाणावर बचत अपेक्षित आहे. शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभागीय कार्यालय यांची दुय्यम कार्यालये, संलग्न शिक्षणसंस्था यांना या वेबसाईटवरून माहितीचे थेट आदानप्रदान होत आहे. ही माहिती पाहण्यासाठी व डाऊनलोड करून घेण्यासाठी त्यांनी दररोज किमान एकदा या वेबसाईटला भेट द्यावी.

img


श्री. सत्यवान धर्मा सोनवणे
शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग

इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची सूचना

मराठी - कोल्हापूर शहरस्तरीय इ.अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२१ अंतर्गत प्रवेश फेरी-१ ची गुणवत्ता/निवड यादी (Allotment) दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी जाहीर केली जाणार होती. तथापि माननीय सर्वोच्च न्यायालय SEBC आरक्षण संदर्भातील आदेशाचे अनुषंगाने यापुढील इ.११वी प्रवेश प्रक्रियेची सदर कार्यवाही पुढे ढकलण्यात येत आहे. ११वी प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल.

English - Declaration of Allotment list for Round-1 was scheduled to display on 10th September 2020, as a part of Std.11th Centralised Kolhapur City Online Admission process 2020-21. However, with reference to the orders of Hon'ble Supreme Court of India, (Regarding SEBC reservation) rest admission process is postponed till further notice. Further time table for 11th Online Admission process will be declared after the Government Approval.

ताज्या घडामोडी