प्रास्ताविक...
महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या शैक्षणिक व प्रशासकीय सोयीसाठी राज्यस्तरावर
शिक्षण संचालनालयाची व विभागीय स्तरावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाची निर्मिती
केलेली आहे. शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख हे शिक्षण संचालक असून राज्यामध्ये 8 विभागीय
शिक्षण उपसंचालक आहेत. त्यात कोल्हापूर विभागीय उपसंचालक यांचे कार्यालय सोमवार पेठ,
हत्तीमहल, गंजी गल्ली, कोल्हापूर या ठिकाणी असून या विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली,
सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे येतात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक,
अध्यापक विद्यालये व प्रौढ शिक्षण स्तरावरील शैक्षणिक व प्रशासकीय बाबींसदर्भात विभागीय
प्रमुख म्हणून विभागीय उपसंचालक हे काम पाहतात. विभागीय कार्यालय, दुय्यम कार्यालये
तसेच शिक्षणसंस्था यांच्यात माहितीचे आदानप्रदान सुलभ व वेगवान व्हावे तसेच, कार्यालयीन
कामकाजात पारदर्शकता व सुसूत्रता यावी यासाठी शासनाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक धोरणास
अनुसरून या वेबसाईटची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मनुष्यबळ, वेळ, इंधन व पैसा यांची
मोठ्या प्रमाणावर बचत अपेक्षित आहे. शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभागीय कार्यालय यांची
दुय्यम कार्यालये, संलग्न शिक्षणसंस्था यांना या वेबसाईटवरून माहितीचे थेट आदानप्रदान
होत आहे. ही माहिती पाहण्यासाठी व डाऊनलोड करून घेण्यासाठी त्यांनी दररोज किमान एकदा
या वेबसाईटला भेट द्यावी.
श्री. महेश जगन्नाथ चोथे
शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग